Ad will apear here
Next
ऐतिहासिक शनिवारवाड्याला झाली २८७ वर्षे पूर्ण

पुणे : महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुण्याचा ऐतिहासिक मानबिंदू म्हणजे शनिवारवाडा. हिंदवी स्वराज्याचा झेंडा अटकेपार फडकवणाऱ्या पेशव्यांचे शौर्य, वैभव याचा साक्षीदार असलेल्या शनिवारवाड्याला मंगळवारी, २२ जानेवारी २०१९ रोजी तब्बल २८७ वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त वाड्याच्या भक्कम तटबंदीसोबत उभा असलेला भव्य दिल्ली दरवाजा उघडण्यात आला होता. या क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. 


शनिवारवाड्याच्या दिल्ली दरवाज्याने २२ जानेवारी १७३२ ते २२ जानेवारी २०१९ एवढा प्रदीर्घ काळ अनुभवला आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त वर्षातून एकदाच हा दिल्ली दरवाजा उघडण्यात येतो. त्यामुळे नागरिकांनी येथे गर्दी केली होती. दरवाजा उघडताच, टाळ्यांच्या कडकडाटात एकच जल्लोष करत उपस्थित नागरिकांनी आनंद व्यक्त केला.


थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानतर्फे यानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी इतिहासतज्ज्ञ मोहन शेटे, पेशव्यांचे वंशज उदयसिंह पेशवा, प्रतिष्ठानचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त), कुंदनकुमार साठे, अनिल नेने आदी उपस्थित होते. या वेळी श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे व श्रीमंत नानासाहेब पेशवे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. 


या वेळी बोलताना मोहन शेटे म्हणाले, ‘ दहा जानेवारी १७३० रोजी वाड्याचे भूमिपूजन झाले होते, तर २२ जानेवारी १७३२ रोजी वाड्याची वास्तुशांती करण्यात आली होती. शनिवारवाडा हा मराठ्यांचा मानबिंदू आहे. जगात केवळ दोन ठिकाणी असलेल्या कारंज्यांपैकी एक कारंजे शनिवारवाड्यात आहे. कात्रजपासून आणलेली दगडी पाइपलाइन हेदेखील आश्चर्य आहे.’

उदयसिंह पेशवा म्हणाले, ‘शनिवारवाड्यातील अनेक गोष्टींची आज दुरवस्था झालेली आहे. त्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.’

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/XZKTBW
Similar Posts
दिनदर्शिकेतून उलगडले ‘स्मरणरम्य पुणे’ राज्याची सांस्कृतिक राजधानी आणि ऐतिहासिक शहर असा नावलौकिक असलेल्या पुण्याच्या जुन्या आठवणी जागवणारी ‘स्मरणरम्य पुणे’ ही दिनदर्शिका नुकतीच प्रकाशित झाली आहे. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धातील पुण्यातील काही महत्त्वपूर्ण घडामोडी, वाड्यांसारख्या वास्तूंचे सौंदर्य टिपणारी, तसेच महात्मा गांधी, इंदिरा गांधी, बॅ
... आणि शनिवारवाड्याचा मुख्य दरवाजा उघडला! पुणे : पुण्यातील ऐतिहासिक शनिवारवाड्याच्या वर्धापनदिनानिमित्त २२ जानेवारी २०२० रोजी शनिवारवाड्याचा मुख्य दरवाजा अनेक वर्षांनी उघडण्यात आला. बाजीराव पेशवे प्रतिष्ठानतर्फे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात अनेक इतिहासप्रेमी नागरिकांसह पेशव्यांचे वंशज सहभागी झाले होते.
शनिवारवाड्याला २९१ वर्षे मराठी साम्राज्याची शान असलेल्या आणि अटकेपार झेंडा फडकविणाऱ्या कर्तबगार पुरुषांची मालिका पाहण्याचे भाग्य लाभलेल्या शनिवारवाड्याच्या भूमिपूजनाला १० जानेवारी २०२१ रोजी २९१ वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्ताने शनिवारवाड्याबद्दलची ही माहिती...
वेडात मराठे वीर दौडले सात... नाट्यातून उलगडला इतिहास.. पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म... त्यांचे बालपण... तानाजी मालुसरे-शिवाजी महाराज भेट... अफझलखानाचा वध... बहलोल खानाचा धुमाकूळ... बहलोल खानास धुळीस मिळवा.. महाराजांचे फर्मान... आपल्या सहा सरदारांबरोबर प्रतापरावांनी बहलोल खानाच्या छावणीवर केलेली चढाई... अशा चित्तथरारक प्रसंगांतून ५० कलाकारांनी ‘वेडात मराठे वीर दौडले सात

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language